दर्डा पिता पुत्रांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिली स्थगिती

न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून कोठेही जाण्याता येणार नसल्याचं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
दर्डा पिता पुत्रांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिली स्थगिती

कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यांना आता दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. दर्डा पिता पुत्रांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

छत्तीसगडमधील खाणवाटप प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा गुन्हा कनिष्ठ न्यायालयानं जुलैमध्ये विजय दर्डा, वेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांच्यावर लावला होता. त्यांना या प्रकरणी दोषी ठरवत न्यायालयानं चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दर्डा यांनी या निकालाला आणि सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान दिलं आहे. त्याचप्रमाणे या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षा स्थगित करावी, अशी विनंती करणारी याचिकाही त्यांनी सादर केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं आज त्यांची ही याचिका मान्य केली आहे आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. मात्र, या प्रकरणी दोषींना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून कोठेही जाण्यास परवानगी दिलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in