संग्रहित छायाचित्र
पूजा खेडेकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

पूजा खेडकरला दिलासा; उच्च न्यायालयाकडून अटकेला ५ सप्टेंबरपर्यंत अंतरिम संरक्षण

माजी सनदी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.
Published on

नवी दिल्ली : माजी सनदी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

फसवणूक करून इतर मागासवर्ग आणि दिव्यांगांसाठीच्या आरक्षणातून लाभ मिळविल्याचा तिच्यावर आरोप आहे. खेडकर हिने केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी न्या. एस. प्रसाद यांनी तोपर्यंत पुढे ढकलली असून, दरम्यानच्या कालावधीत पोलिसांना नवा स्थिती अहवाल सादर करण्याची मुभा दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि दिल्ली पोलिसांनी अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in