सच्चर समिती अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी
सच्चर समिती अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी

मुंबई : देशातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सच्चर समितीचा अहवाल २००६पासून दाबून ठेवण्यात आला आहे. या अहवालाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठी मुस्लिम सेवा संघाचे सचिव सरफराज अहमद यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. भूमिपुत्र मराठी मुस्लिम समाजावर परप्रांतीय राजकीय नेतृत्व लादण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी यावेळी केली. सरकारच्या इतर मागासवर्गीय महामंडळामध्ये व अल्पसंख्याक महामंडळामध्ये भेदभाव करू नये. सर्व योजनांची माहिती शाळा, कॉलेज तसेच गरजूपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अलहाज शेख यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in