राहुल गांधींविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. दरम्यान, दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही राहुल गांधी पुणे न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गैरजमानती अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी पुणे कोर्टात केली आहे.
राहुल गांधी
राहुल गांधी संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. दरम्यान, दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही राहुल गांधी पुणे न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गैरजमानती अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी पुणे कोर्टात केली आहे.

सोमवारी झालेल्या सुनावणीस हजर राहण्याचे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आला होते. मात्र ते हजर राहिले नाही. आता पुढील सुनावणी ही १० जानेवारीला होणार आहे. अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, पुढील तारखेला राहुल गांधी हजर राहतील, असे सांगितले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या मते सावरकरांनी एका पुस्तकात म्हटले होते की सावरकरांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकरांना त्यावेळी आनंद झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in