फेब्रुवारी अखेरपासूनच वाढू लागली दुष्काळी झळ; पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी

गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील सर्वच ठिकाणची धरणे, तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत.
फेब्रुवारी अखेरपासूनच वाढू लागली दुष्काळी झळ; पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी
Published on

कराड : फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अद्यापही १० दिवस बाकी असतानाच केवळ उन्हाची तीव्रता वाढल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने व 'कोयने' तील पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग करण्याच्या मागणीने जोर धरल्याने अखेर मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा कोयना धरणातून एकूण २६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

प. महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत आतापासूनच शेतीच्या पाण्यासह विविध गावांतील पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाण्याची कमतरता भासू लागल्याने या जिल्ह्यांतून 'कोयना' धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी वाढू लागली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून कोयना धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वा कोयना धरणाचे आपत्कालीन दरवाजा उघडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही जनित्रे सुरू करून त्याद्वारे २१०० क्युसेक्स असा एकूण २६०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील सर्वच ठिकाणची धरणे, तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. तसेच कमी पाऊस पडल्याने जमिनीमध्ये पाणी पाझरून पाणी पातळी उंचावली नाही. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार, असा अंदाज सर्वांनाच आला होता; मात्र ही टंचाई फेब्रुवारीपासून न जाणवता, साधारणपणे मे महिन्यामध्ये जाणवेल असा अंदाज होता. तथापि, फेब्रुवारी महिना अद्यापही दहा दिवस बाकी असतानाच प. महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत आतापासूनच शेतीच्या पाण्यासह विविध गावांतील पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाण्याची कमतरता भासू लागल्यानेया जिल्ह्यांतून 'कोयना' धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी वाढू लागली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून कोयना धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वा. कोयना धरणाचे आपत्कालीन दरवाजा घडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही जनित्रे सुरू करून त्याद्वारे २१०० क्युसेक्स असा एकूण २६०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, आगामी उन्हाळ्यात वळीव अथवा अवकाळी पावसाने हजेरी लावत गेल्या पावसाळ्यातील आपली गैरहजेरी भरून काढली, तर किमान लोकांच्यासह जनावरे, पशु-पक्ष्यांचा पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न मार्गी लागेल, अन्यथा या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सर्वानाच सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोयना धरणात पाणीसाठा किती?

मंगळवारी दुपारी १२ वा. पासून कोयना धरणातून कोयना नदीमध्ये एकूण २६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तरीही धरणातील पाणी पातळी २१२७ फूट १ इंच म्हणजेच ६४८.३३५ मीटर आहे. धरणात मंगळवारी एकूण पाणीसाठा ६७ .४९ टीएमसी म्हणजेच ६४.१२% होता. यातील उपयुक्त पाणीसाठा ६२.३७ टीएमसी म्हणजेच ६२.२९% इतका होता.

logo
marathi.freepressjournal.in