अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या मंजूर; सामान्य प्रशासन, कृषी, मराठी भाषा, महसूल व वन विभागाच्या मागण्यांचा समावेश

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली.
अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या मंजूर;  सामान्य प्रशासन, कृषी, मराठी भाषा, महसूल व वन विभागाच्या मागण्यांचा समावेश
(संग्रहित )
Published on

मुंबई : २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, महसूल व वन, मराठी भाषा या विभागांच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या मांडण्यात आल्या. सभागृहात या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी, मंत्री आशीष शेलार यांनी सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, मंत्री गणेश नाईक यांनी वनविभाग, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी महसूल विभाग, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच मराठी भाषा विभागाच्या मागण्या सभागृहात मांडल्या.

पुरवणी मागणीवरून महायुतीवर सभागृहात टीका झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in