यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले ; हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार

हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट
यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले ;  हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार

यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे

यवतमाळमधील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर नागपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपण तातडीने महागावला रवाना होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असेही फडणवीस म्हणाले आहेत. यवतमाळमधील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in