संभाजीनगरमधील राड्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, "काही नेते जाणीवपूर्वक..."

छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा येथे २ गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांची वाहनेही पेटवून देण्यात आल्याचे समोर आले
संभाजीनगरमधील राड्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, "काही नेते जाणीवपूर्वक..."

छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा येथे काल रात्री २ वाजता दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या सर्व प्रकरणावरून आज राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहेत. काही विरोधकांनी यामध्ये राज्य सरकारचा हात असल्याची टीका केली. या सर्व प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "घडलेली घटना ही दुर्दैवी असून काही नेते भडकाऊ प्रतिक्रिया देत असून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहेत." असे म्हणत टीका केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगरमधील घटना ही दुर्दैवी असून त्या ठिकाणी आता शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काही नेते प्रक्षोभक विधाने करून परिस्थिती चिघळली पाहीजे, असा प्रयत्न सुरु आहे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीची विधाने न करता सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल, तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही," असे म्हणत त्यांनी टीका केली.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सगळे मित्र आहेत. महानगरपालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा खेळ केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचे प्लॅनिंग आहे." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, २ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा संभाजीनगरमध्ये होणार आहे, त्यामध्ये विघ्न आणण्यासाठी हा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे," अशी टीका यावेळी त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in