"३० वर्षे तुमची नापीक जमीन आम्हाला द्या, आम्ही..." काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?

बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनेता अमीर खानचे कौतुक
"३० वर्षे तुमची नापीक जमीन आम्हाला द्या, आम्ही..." काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?

आज बालेवाडी येथे पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, "सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्याबदल्यात एका एकरमागे ७५ हजार रुपये मोबदला म्हणून दिले जाणार आहेत." यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, "शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार असून जेवढे काही अॅग्रीकल्चर फीडर असतील ते सर्व सोलारवर चालवण्यात येतील. हे फीडर सोलारवर आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार असून हे काम यंदाच्या वर्षी सुरु करण्यात येत आहे." असे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, "सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसे काही पीकत नसले, तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमच्याच नावावर असणार आहे. याशिवाय वर्षाला ७५ हजार रुपये भाडे देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ करण्यात येईल." असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जमीन नापिक होण्यावर खंत व्यक्त केली. केमिकलच्या वापरामुळे जमिनीची रोग प्रतिकारशक्ती कमी होत आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, "आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेतीली सुरुवात केली आहे. त्यासाठी एक प्लॅन तयार केला असून जवळपास यावर ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. यातून आपली उत्पदक्ता वाढेल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in