सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून मुख्य न्यायाधीशांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारावे आणि त्यांच्याशी चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करणे संविधानाला अपेक्षित आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला.
सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Photo-X)
Published on: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून मुख्य न्यायाधीशांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारावे आणि त्यांच्याशी चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करणे संविधानाला अपेक्षित आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे आंदोलन म्हणजे ‘मॅन्युफॅक्चर्ड प्रोटेस्ट’ असल्याची टीका करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला कोणत्याही परिस्थितीत हात लावू देणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्लीत मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

समाजमाध्यमांवर अपशब्द वापरणे अयोग्य

‘सत्ताविभाजनाच्या तत्त्वानुसार न्यायपालिका स्वतंत्र असून, न्याय हवा असल्यास न्यायालयात याचिका दाखल करणे हाच घटनात्मक मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयानेही संबंधिताना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे स्वतःला संविधानवादी म्हणविणाऱ्या राष्ट्रीयतावादी आणि उदारमतवादी विचारांच्या लोकांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. न्यायालयाच्या भूमिकेनंतर सर न्यायाधीशांविरोधात समाजमाध्यमांवर अपशब्द वापरणे हा सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला.

देश आणीबाणीच्या दिशेने चाललाय का? -सुप्रिया सुळे

दिल्ली पोलिसांच्या मनात नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही. ही संपूर्ण परिस्थिती पाहता, देश आणीबाणीच्या दिशेने चालला आहे की काय, अशी भीती आणि भावना आज अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. देशात पारदर्शक निवडणुका झाल्याच पाहिजेत. ज्ञानेश कुमार यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in