मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, असे निर्देश जिल्हा पातळीवरील युनिट्सना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
Published on

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, असे निर्देश जिल्हा पातळीवरील युनिट्सना देण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी युती शक्य न झाल्यास मित्रपक्षांवर टोकाची टीका न करण्याचेही स्पष्ट निर्देश पक्ष संघटनेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

फडणवीस यांनी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणले, पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक परिस्थितीचा सखोल आणि सकारात्मक आढावा घेण्यात आला आहे. पुणे येथील आढावा पूर्ण झाल्यावर आता कोकण विभागाचा आढावा मुंबईत घेण्यात येणार आहे. आजच्या आढाव्यात अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, असे त्यांनी नमूद केले. पक्ष संघटनेसाठी बूथ रचना आणि निवडणुकीच्या संदर्भात पुढचे दिशानिर्देश देण्यासाठी हे आढावा सत्र महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही उद्धवजींना रस्त्यावर उतरू देणार नाही

मदतीस विलंब झाल्यास मोर्चा काढण्याच्या उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला राजकीय उत्तर दिले. हे विरोधी पक्षाचे काम आहे," असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, याचा अर्थ मदतीवर त्यांचा विश्वास आहे आणि आम्ही केलेली मदतही त्यांना मान्य आहे. "आम्ही उद्धवजींना रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ," असा टोला त्यांनी लगावला.

घायवळ प्रकरणाची चौकशी करणार

अहिल्यानगर जिल्ह्यात पासपोर्टसाठी अर्ज करताना घायवळला क्लीन चीट कशी मिळाली, यावर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, "तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय - दबावापोटी पोलिसांनी त्यांना पूर्णपणे क्लीनचिट दिली आणि यांच्यावर कोणताही - गुन्हा नसल्याचा अहवाल सादर केला. यावर कठोर कारवाईचे संकेत देताना मुख्यमंत्री म्हणाले, "अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, त्याला कोणत्याही पक्षाने थारा देता कामा नये. अशा प्रवृत्तीवर कारवाई केली जाईलच, पण त्याचबरोबर ज्यांनी - दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल सादर केला त्यांचीही चौकशी - केली जाईल. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी - समितीच्या घोषणेतील विलंबाबाबत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत, - पुढच्या आठ-दहा दिवसांत ती कार्यकारिणी जाहीर होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पाटील-पडळकर वाद

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादावर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू नये, हे आमचे स्पष्ट मत असल्याचे सांगितले. 'चंद्रकांत दादांनी स्वतः पुढाकार घेऊन वैयक्तिक वाद आणि चिखल फेक मिटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले. रवींद्र धंगेकरांच्या टीकेवर बोलताना, 'मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे, मी त्यांचे जे बॉस साहेब त्यांच्याशी बोलेल,' असे सांगत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

logo
marathi.freepressjournal.in