विधानसभेला राज ठाकरेंचा विचार करू

लोकसभा निवडणुकीचे जागावाटप करताना राज ठाकरे यांना जागा देता आली नाही.
विधानसभेला राज ठाकरेंचा विचार करू
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे जागावाटप करताना राज ठाकरे यांना जागा देता आली नाही. पण विधानसभेसाठी त्यांचा विचार करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाले. पण, आता तीन पक्षांत मिळून केवळ ४८ जागा होत्या. त्यामुळे त्यांच्या पक्षाला जागा देऊ शकलो नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा विचार करू, असे फडणवीस म्हणाले. अजित पवार त्यांच्यावरील आरोपांमुळे युतीत आले नाहीत, तर ते विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in