फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडसवीस हे आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. याआधी हा विक्रम शरद पवारांच्या नावे होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला २ हजार ४३० दिवस पूर्ण झाले आहेत. तर, शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ही एकूण २ हजार ४१२ दिवसांची राहिली आहे.
फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी
फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडसवीस हे आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. याआधी हा विक्रम शरद पवारांच्या नावे होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला २ हजार ४३० दिवस पूर्ण झाले आहेत. तर, शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ही एकूण २ हजार ४१२ दिवसांची राहिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ राहिलेले तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी या स्थानावर शरद पवारांचे नाव होते. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढील पाच वर्षे सलग मुख्यमंत्रीपदावर राहून त्यांनी या पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, राज्याच्या राजकीय इतिहासात गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’नंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर आले. मात्र, त्यांना अवघ्या काही दिवसांत राजीनामा द्यावा लागला.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ५ डिसेंबर २०२४ रोजी फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०१४ पासून ते १२ जुलै २०२६ पर्यंतचा कालखंड लक्षात घेता, फडणवीस हे एकूण ६ वर्षे ७ महिने म्हणजेच २ हजार ४३० दिवस मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत.

तर, शरद पवार हे सुमारे ६ वर्षे २२१ दिवस म्हणजेच साधारणतः २ हजार ४१२ दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. विशेष म्हणजे, पवारांनी चार वेळा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यापैकी एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत.

दरम्यान, सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्यांच्या यादीत वसंतराव नाईक यांचे नाव अग्रस्थानी आहे. ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री बनलेले वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे ७८ दिवस या पदावर होते. सुमारे ४ हजार ९६ दिवस ते राज्याचा कारभार हाकत होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाची त्यांची ही प्रदीर्घ कारकीर्द सलग होती.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते

  • वसंतराव नाईक : ११ वर्षे ७८ दिवस (४ हजार ९६ दिवस)

  • विलासराव देशमुख : सुमारे ७ वर्षे १२९ दिवस (२ हजार ६८६ दिवस)

  • देवेंद्र फडणवीस : सुमारे ६ वर्षे ७ महिने (१२ जुलै २०२६ पर्यंत २ हजार ४३० दिवस, कार्यकाळ सुरू असल्याने रोज वाढ)

  • शरद पवार : सुमारे ६ वर्षे २२१ दिवस (२ हजार ४१२ दिवस)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in