फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत; व्हिडिओ झाला होता व्हायरल

साताऱ्यातून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत; व्हिडिओ झाला होता व्हायरल
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले यास पोलिसांनी सातारा येथून अटक केली. नवले याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवलेने एका व्हिडीओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजात तेढ निर्माण होईल, अशा भाषेत टीका केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. याप्रकरणी किंचक नवले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्याने देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in