सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिबद्धता; ५६ हजार कोटींचे १५ सामंजस्य करार; सागरी व्यापारात महाराष्ट्राचे नेतृत्व - फडणवीस

सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिबद्धता; ५६ हजार कोटींचे १५ सामंजस्य करार; सागरी व्यापारात महाराष्ट्राचे नेतृत्व - फडणवीस
सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिबद्धता; ५६ हजार कोटींचे १५ सामंजस्य करार; सागरी व्यापारात महाराष्ट्राचे नेतृत्व - फडणवीसPhoto : X (@CMOMaharashtra)
Published on

मुंबई : सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नेस्को, गोरेगाव येथे आयोजित इंडिया मेरीटाइम वीक २०२५ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ विविध सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबईसाठी जल वाहतूक महत्त्वाची आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच, इलेक्ट्रिक व्हेसल ताफा आणला जात आहे, ज्यामुळे जलवाहतूक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनेल, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यात जल क्रीडा केंद्रे, जहाज बांधणी उद्योग आणि ब्ल्यू इकॉनॉमी प्रकल्प विकसित होत आहेत. वाढवणसारखे मोठे बंदर उभारण्यात येत असून, त्यामुळे महाराष्ट्र देशाच्या सागरी क्षेत्रात नेतृत्व करेल, वाढवण बंदर राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी रस्ते मार्गे जोडले जाणार आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा फायदा संपूर्ण राज्याच्या विकासासाठी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सागरी क्षेत्रात प्रचंड विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जहाज बांधणी धोरण, प्रवासी जलवाहतूक आणि सागरी पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रगण्य ठरत आहे, असे बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले.

सागरी क्षेत्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय!

सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात बंदर विकास, जहाज बांधणी, सागरी संशोधन, आणि तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. दिघी बंदर आणि वाढवण बंदर या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे राज्याच्या सागरी व्यापार क्षमतेत वाढ होणार आहे. आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने संशोधन आणि कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे. राज्यात या माध्यमातून हजारो रोजगाराच्या संधी, नव्या उद्योगांचे आकर्षण आणि विकसित भारत २०४७ या उद्दिष्टाकडे वाटचाल गतिमान होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in