फडणवीसांवर कामाचा लोड जास्त झालाय, त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अ‍ॅग्रोची काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ईडीच्या आधिकाऱ्यांना आम्ही व्यवस्थितपणे सहकार्य केले. माझा ईडीच्या अधिकाऱ्यांबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र, आज आमच्यावर कारवाई होत आहे. भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाया का थांबल्या? असा सवालही त्यांनी केला.
फडणवीसांवर कामाचा लोड जास्त झालाय, त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल

काल पुणे येथे कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "देवेंद्र फडणवीस ज्या शहरात असतात, त्याच शहरात दिवसाढवळ्या खून होतात. त्यांच्यावर कामाचा लोड जास्त झालाय. फडणवीस यांनी कोणतेही एकच पद सांभाळावे. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा", असे रोहित पवार म्हणाले. शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने(ED) रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर धाड टाकली, याप्रकरणी पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अ‍ॅग्रोची काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ईडीच्या आधिकाऱ्यांना आम्ही व्यवस्थितपणे सहकार्य केले. माझा ईडीच्या अधिकाऱ्यांबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र, आज आमच्यावर कारवाई होत आहे. भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाया का थांबल्या? भाजपसोबत गेले की कारवाई थांबवण्यात येते, असा दावा त्यांनी केला. तसेच, काहीजण सुडाचे राजकारण करत आहेत. हातोडा घेऊन गेलेल्यांचे काय झाले? आमच्यावर कारवाई होण्यापूर्वी दिल्लीत कोण गेले होते ते माहिती आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

काल पुण्यात घडलेल्या प्रकारावर देखील त्यांनी भाष्य केले. भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पोलिस अधिकाऱ्याला कानशिलात लगावली, तरी देखील अजित पवार गप्प का होते? भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत चार ते पाच पोलिसांना भाजप आमदारांकडून मारहाण झाली आहे. आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते. पण,आता नवीन प्रथा सुरु झाली आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in