अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण बंद करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावले

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. यासंदर्भात होत असणारा वाद हा अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे राजकारण यात कसं पाहता येईल, हा प्रयत्न करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण बंद झाले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वांना खडसावले.
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण बंद करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावले
Published on

नागपूर : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. यासंदर्भात होत असणारा वाद हा अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे राजकारण यात कसं पाहता येईल, हा प्रयत्न करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण बंद झाले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वांना खडसावले.

शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे एक मोठे नेते अजितदादा पवार हे दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे, असे ठाम मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दुर्दैवी घटनेतून काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेत लोकप्रिय असलेले नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणे अत्यंत चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क व आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सध्या सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरूनही उलटसुलट चर्चा रंगल्या. त्यामुळे फडणवीसांनी स्पष्ट केले की, या सर्व घडामोडींमध्ये अनावश्यक राजकीय अर्थ लावणे योग्य नाही. दु:खद प्रसंगात संयम राखणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in