
मुंबई: दोन समाजांना झुंजवत ठेवून त्यांच्यात तेढ निर्माण करणे हे आपल्या तत्त्वात बसत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते म्हणाले की, "मराठा समाजाला आज जे १० टक्के आरक्षण आपण दिले ते टिकले आहे. मराठा समाजाला आरक्षण आहेच. त्याबाबत वेगवेगळी मते आहेत. काहींचे मत आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, काहींचे मत आहे की वेगळ्या पद्धतीने द्या. शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते. कुठले राज्य असा विचार करेल की, आपल्या राज्यातील एक मोठा घटक असंतुष्ट राहावा ? त्याने काय फायदा आहे? सर्वांना संतुष्ट करावे, असाच आपला विचार असतो. पण असे करत असताना एकाच्या संतुष्टीसाठी दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणासाठी उभे करा. एकमेकांशी भांडत राहा, झुंजवत ठेवा, हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला ते करायचेही नाही. राजकारण चुलीत गेले, पण अशाप्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात कुठेही बसत नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.