"आता अनेकांची तोंडं बंद होतील" ; ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेवर देवेंद्र फडणवीसांची सुचक प्रतिक्रिया

ड्रग्ज फ्री महाराष्ट्र संकल्पनेवर आधारीत जी परिषद झाली तेव्हा याचा बिमोड करण्यास सगळ्यांना सांगण्यात आल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
"आता अनेकांची तोंडं बंद होतील" ; ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेवर देवेंद्र फडणवीसांची सुचक प्रतिक्रिया

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी तामिळनाडूच्या चेन्नईमधू अटक केली. या मोठ्या कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे अनेकांचे लगे बांधे समोर आले आहेत. आता अनेकांची तोंड बंद होतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र संकल्पनेवर आधारीत जी परिषद झाली तेव्हा याचा बिमोड करण्यास सगळ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार सगळे युनिट्स कामाला लागले आहे. मुंबई पोलिसांना देखील नाशिकची माहिती मिळाली आणि त्यांनी धाड टाकली.

आता ललित पाटील हाती आला आहे. यानंतर मोठं जाळं बाहेर येईल. एक मोठा नेक्सस आता समोर आला आहे. आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि अनेकांची तोंडं बंद होणार आहेत. या प्रकरणी सगळी चौकशी केली जाणार असून कोणालाही सोडलं जाणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.

ललित पाटील याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बंगळुर आणि चेन्नईदरम्यानच्या एका ठिकाणाहून लाक रात्री उशिरा ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. सकाळी कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दरम्यान, यावेळी ललित पाटील याने मीडियासमोर आपण ससूनमधून पळून गेलो नव्हतो तर आपल्याला पळवलं गेलं होतं. असा खळबळ जनक आरोप केला. त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in