
मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड उघड दिसून आली. मंत्री मंडळाच्या काही बैठकीकडे पाठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे पाठ यावरून एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी को - ऑर्डिनेशन रुमची स्थापन केली आहे. राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वॉर रुम असताना वॉर रुमच्या जवळच को ऑडिनेशन रुमची स्थापन करणे म्हणजे फडणवीसांच्या तोडीस शिंदेंचा को ऑर्डिनेशन रुम म्हणजे फडणवीस विरुद्ध शिंदे कोल्ड वॉर सुरुच आहे.
महायुती सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विविध मुद्द्यांवरून नाराजी नाट्य सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळताच प्रशासकीय कामाचा १०० दिवसांचा आढावा घेण्याचा सपाटा लावला. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागातील कामाची झाडाझडती घेण्यास फडणवीस यांनी सुरुवात केली. फडणवीस यांनी प्रशासकीय पकड मजबूत करण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकारी वर्गाला लक्ष करताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली. फडणवीस यांच्या सत्तेत दुजाभाव होत असल्याची उघड उघड नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर शिंदे विरुद्ध फडणवीस असा छुपा संघर्ष सुरूच आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा सातव्या मजल्यावर वॉर रुम आहे. या वॉर रुमच्या जवळच को - ऑर्डिनेशन रुमची स्थापन केल्याने शिंदे विरुद्ध फडणवीस ही दरी वाढत असल्याचे बोलले जाते.