माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे पुण्यात निधन

देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे पुण्यात निधन

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळख असलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे आज निधन झाले. त्यांचे पती देवीसिंह शेखावत यांनी वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीसिंह शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (२४ फेब्रुवारी) सकाळी ९.३०च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवीसिंह शेखावत हे अमरावती शहराचे पहिले महापौर होते. तसचे, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यही होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in