धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद ? मनोज जरांगे यांचा फडणवीस, पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याच्या हालचाली झाल्यानंतर मराठा आरक्षण सुरू चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याच्या हालचाली झाल्यानंतर मराठा आरक्षण सुरू चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पुण्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, "धनंजय मुंडे यांच्यावरील चौकशीतून त्यांना दिलासा मिळाल्यास त्यांना संधी दिली जाईल." त्यांनी चौकशीचा तपशील दिला नसला, तरी अनेकांनी अंदाज व्यक्त केला की, ही चौकशी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित असावी.

९ डिसेंबर २०२३ रोजी बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, अत्याचार आणि नंतर हत्या झाली होती. त्यांनी एका पवनचक्की प्रकल्पातील खंडणीविरोधात आवाज उठवला होता. या घटनेने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या प्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांची अटक झाल्यानंतर विरोधकांबरोबरच महायुतीतील काही नेत्यांनीही मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली होती. परिणामी, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

या पार्श्वभूमीवर जरांगे म्हणाले, "हिंसेचा गौरव करणाऱ्या व्यक्तींना सत्ताधाऱ्यांकडून मंत्रिपदाचे बक्षीस दिले जात आहे. ही राज्य सरकारची अत्यंत धक्कादायक भूमिका आहे."

जरांगेंनी परळीतील रहिवासी महादेव मुंडे यांच्या खुनाचाही उल्लेख केला. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांचे अपहरण केले होते. त्यांचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेस विलंब होत असल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नीने गेल्या आठवड्यात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले होंते.

मुंडेंना विरोध करू -सुप्रिया सुळे

वाल्मिक कराडमागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट देऊन मंत्रिमंडळात घेणार असाल तर त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in