मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला दिलीच नाही; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आक्षेप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बुधवारी हक्कभंग आणणार, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्र
नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्रएक्स
Published on

मुंबई : तीन महिन्यांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती महायुती सरकारकडून सभागृहाच्या पटलावर सादर करणे अपेक्षित होते. मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याची बातमी थेट प्रसारमाध्यमांना दिल्याने हा सभागृहाच्या अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बुधवारी हक्कभंग आणणार, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत, पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी उद्या सभागृहात करू, असे नाना पटोले म्हणाले.

यात कुठे नैतिकतेचा मुद्दा आहे? - सुप्रिया सुळे

छगन भुजबळ आणि पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्टेटमेंट आले की, नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. पण धनंजय मुंडेंचं ट्विट आले आहे. ते सर्वांनी पाहावे आणि वाचावे. मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न ही नाही. त्यांनी स्वत:च्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे, असे ट्विट केले आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं म्हणणे खोडून काढले. सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी थेट मोबाईल उघडून मुंडेंचं ट्विट दाखवत यात कुठे नैतिकतेचा मुद्दा आहे? असा सवाल केला.

logo
marathi.freepressjournal.in