Video- धारावी पुनर्विकास: अदानींच्या मुख्यालयावर धडक मोर्चा, लाखो लोक रस्त्यावर; 'या' आहेत प्रमुख मागण्या

धारावीचा पूनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने या प्रकल्पाच्या विरोधाची 'मशाल' पेटली आहे.
Video- धारावी पुनर्विकास: अदानींच्या मुख्यालयावर धडक मोर्चा, लाखो लोक रस्त्यावर; 'या' आहेत प्रमुख मागण्या

देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. नुकतेच धारावीचा पूनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने या प्रकल्पाच्या विरोधाची 'मशाल' पेटली आहे.

अदानी समूहाला प्रकल्प देण्याच्या विरोधात शिवसेनेने ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला असून अदानींचे मुख्यालय असलेल्या बीकेसीतील कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिकांसह धारावीतील लाखो नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.

काय आहेत मागण्या?

  • धारावीचा पुर्नविकास अदानी समूहाऐवजी सरकारने करावा, ही प्रमुख मागणी

  • धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमावी

  • धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करावं

  • निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं.

  • महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत देण्यात यावं.

  • धारावीतील झोपडपट्ट्यांमधून अनेक छोटेमोठे व्यवसाय चालतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं.

  • पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करून, निवासी, अनिवासी रहिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात करावी

  • प्रकल्पाचं स्वरूप समजावं यासाठी मास्टर प्लान आधीच जाहीर करून सविस्तर माहिती देण्यात यावी

देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा

यापूर्वी, गुजरातमध्ये गेल्या काही काळात सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत आणि ते नंतर महाराष्ट्रात येतंय. त्यामुळे अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असाल तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे. हा मुंबई विकण्याचा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा कुठे होत असेल तर तो धारावीत पुनर्विकास प्रकल्पात होत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दुसरीकडे, ठाकरे गटाचा आजचा मोर्चा टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन काढण्यात येणार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in