धारावी देशातील उत्पादनाचे केंद्र बनेल - राहुल गांधी

राहुल गांधी हे आज दक्षिण मुंबईतील मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर न्याय संकल्प पदयात्रेतही सहभागी होणार आहेत.
धारावी देशातील उत्पादनाचे केंद्र बनेल - राहुल गांधी
Published on

मुंबई : चैत्यभूमीवर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी आपल्या ६३ दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी गांधी यांच्यासमवेत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा याही उपस्थित होत्या.

त्यापूर्वी धारावी येथे एका सभेत राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेच्या पक्षाच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. आपला पक्ष सत्तेवर आल्यास महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

धारावी तुमचीच आहे आणि ती तुमचीच राहील, तुमच्या कौशल्याचा सन्मानच केला जाईल आणि हा परिसर देशातील उत्पादनाचे केंद्र बनेल, असे गांधी यांनी या परिसराचा पुनर्विकास करण्याचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आल्याच्या संदर्भाने सांगितले.

राहुल गांधी हे रविवारी दक्षिण मुंबईतील मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर न्याय संकल्प पदयात्रेतही सहभागी होणार आहेत. त्यानंतर इंडिया आघाडीची एक जाहीर सभाही होणार आहे. त्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन, सपाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव सहभागी होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in