धीरज गावडे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, सचिव दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. उदयसिंह सुतार यांनी धीरज गावडे याचे अभिनंदन केले
धीरज गावडे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

कराड : येथील कृष्णा साखर कारखानाजवळील किल्ले मच्छिंद्रगड (ता.वाळवा) येथील जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड पॉलिटेक्निक महाविद्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठाच्यावतीने आयोजित आंतरविभागीय पुरुष कुस्ती स्पर्धेत यश मिळवले आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी धीरज गावडे याने ७४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. सांगोला येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या धीरज गावडे याची निवड पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, सचिव दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. उदयसिंह सुतार यांनी धीरज गावडे याचे अभिनंदन केले. क्रीडाशिक्षक प्रा. संतोष कदम,प्रा.विक्रांत चव्हाण,विशाल सावंत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in