"त्यांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू", रामदास आठवलेंची टीका

आम्हाला 2024 च्या निवडणुकीत कुठलीही अडचण येणार नाही, इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले, तरी आमचाचा विजय होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
"त्यांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू", रामदास आठवलेंची टीका

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे यांच्यात जवळीक वाढत असून दोघांमध्ये युती होणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगताना दिसत आहेत. यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. ठाकरे गट आणि वंचितच्या 12-12 फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू, अशी टीका आठवले यांनी केली. धुळे दौऱ्यावर असताना त्यांनी याबबातचे विधान केले.

ठाकरे गट आणि वंचितची युती झाली की नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल, ठाकरेंसोबत नाही. त्यांचा 12-12 जागांचा फॉर्म्यूला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.

गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे-

मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत त्यालाही आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा, असेही आठवले यावेळी म्हणाले.

जनता आमच्याच बाजूने -

आम्हाला 2024 च्या निवडणुकीत कुठलीही अडचण येणार नाही, इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले, तरी आमचाचा विजय होईल. जनता त्यांच्या बाजून गेली तरच आमचा पराभव होऊ शकतो. मात्र, जनता आमच्यासोबत असल्यामुळे हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा विश्वास देखील आठवले यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in