मतदान जनजागृतीचा जळगावमध्ये आगळावेगळा पॅटर्न; खान्देशी भरीतची रेसिपी समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मतदान जागृतीचा संदेश

प्रत्येक भागाची एक वेगळी अशी खाद्य संस्कृती असते. किंबहुना तीच त्या भागाची ओळख असते. जळगावचे वांग्यांचे भरीत ही जळगावची राज्यभर नव्हे तर देश विदेशात ओळख आहे.
 मतदान जनजागृतीचा जळगावमध्ये आगळावेगळा पॅटर्न; खान्देशी भरीतची रेसिपी समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मतदान जागृतीचा संदेश

विजय पाठक / जळगाव

प्रत्येक भागाची एक वेगळी अशी खाद्य संस्कृती असते. किंबहुना तीच त्या भागाची ओळख असते. जळगावचे वांग्यांचे भरीत ही जळगावची राज्यभर नव्हे तर देश विदेशात ओळख आहे. हे भरीत बनवण्याची रेसिपी देखील वेगळी असल्याने हे भरीत हे खान्देशच्या खाद्य संस्कृतीची ओळख ठरली आहे. या खाद्य संस्कृती संस्कृतीचा आधार घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट एका नामवंत भरीत केंद्राच्या किचनमध्ये जाऊन भरीताची रेसिपी समजावून घेताघेता तेथील महिला कर्मचारी वर्गाला मतदान जागृतीचे आवाहन केले.

मतदान जागृती व्हाया भरीत रेसिपी विषय हा व्हिडीओमुळे लोकांमध्ये प्रचंड चर्चेत आला. या माध्यमातून महिलांना मत देण्याच्या स्वातंत्र्याचा गौरव केला गेला असून महिलांमध्ये प्रत्येकीने मतदान केलंच पाहिजे हे बळ महिलात निर्माण करण्यास हा व्हिडीओ कारणीभूत ठरत आहे. भरीत करण्यापेक्षाही मतदान करणं सोपं घरात एखादा आवडीचा पदार्थ स्त्रियांना करून खाऊ घालायचा असेल तर त्यांना जरा निवांत वेळ हवा असतो. हे केवळ सुट्टी असेल तरच जमू शकते हे लक्षात घेऊन यंदा मतदानाला लागून शनिवार, रविवार असल्याने महिलांना निवांतपणा मिळेल पण त्यांनी मतदान करायला विसरू नये ते केलेच पाहिजे.

यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील एका भरीत सेंटरमध्ये महिलांच्या किचनमध्ये जाऊन भरीत बनवण्याची रेसिपी कशी असते, हे तेथील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतले. ते जाणून घेत असतांना त्यांनी भरीत जसं भाजावं लागतं, नंतर साल काढावी लागते, तसेच मतदान केंद्रावर जाऊन तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव बघून, तुमचे ओळख पत्र दाखवून, बोटाला शाई लावली जाते. तुम्ही साल काढलेल्या वांग्याची पेस्ट करून त्याला कांदा, जिरे, लसूण इतर मसाल्याबरोबर तडका देता मग ते भरीत चवदार होते. तसेच बोटाला शाई लावल्यानंतर मतदान करायला मतदान बॉक्समध्ये जाऊन तुमच्या मनात क्षणभर विचार येतो, त्यावेळी तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य असता, तुमच्यावर कोणाचाही दबाव नसतो आणि तुमच्याकडून बटण दाबले जाते. त्या तुमचे मत असतं त्याला लोकशाहीमध्ये अमूल्य असे महत्त्व असते. मग तुम्ही एवढं अमूल्य मत करायलाच हवे.

त्यासाठी कोणतेही कारण न सांगता मतदान करायचे आणि मतदान करणे हे भरीत करण्यापेक्षा सोपे आहे, असे आयुष प्रसाद यांनी सहजपणे तेथील महिलांना सांगितले. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून आला, तेच या व्हिडीओचे बलस्थान आहे.

अभिनव कल्पनेचे कौतुक

तयार करण्यात आलेल्या भरीत व्हाया मतदान जागृती व्हिडीओची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहेच. पण हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, त्याच्या अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आयुष प्रसाद यांच्यापर्यंत येत आहेत. यातून मतदान टक्केवारी वाढावी हीच निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी मतदार यादीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. तो मतदान केंद्रापर्यंत यावा यासाठी विविध उपक्रम हाती घेतले त्यातला हा उपक्रम असून याचे देशभर कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in