नऊ महिन्यांत सहा लाख नागरिकांना डिजिटल दाखले

सन २०२२-२३ या‌ वर्षातील १२ महिन्यात ९५४३३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दररोज सरासरी २६१ जात प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते.
नऊ महिन्यांत सहा लाख नागरिकांना डिजिटल दाखले

जळगाव/प्रतिनिधी :जिल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मागील नऊ महिन्यांत थेट घरबसल्या ५ लाख ८१ हजार ९०३ दाखल्यांचे ऑनलाईन वितरण करून गतीशील प्रशासनाचा अनुभव दिला. सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विविध दाखले, कागदपत्रांचे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून वितरण करण्यात येत असते. जिल्ह्यातील १२०९ सेतू केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मागील ९ महिन्यांत नागरिकांना आवश्यक असलेले ५ लाख ८१ हजार ९०३ दाखल्यांचे ऑनलाईन वितरण केले आहे.

जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, भूमिहीन प्रमाणपत्र, तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र, डोंगरी प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व ऐपत प्रमाणपत्र आदी दाखल्याचे नागरिकांना घरबसल्या वितरण करण्यात येत असते. नागरिक गावा-गावात कार्यरत सेतू सेवा केंद्रात शासकीय फी भरून नागरिक या विविध दाखल्यांसाठी घरबसल्या अर्ज करत असतात. किंवा नागर‍िक स्वत: आपले सरकार पोर्टलवर जाऊन या दाखल्यांसाठी अर्ज करू शकतात.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत जात प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रांसाठी ६१२५३७ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५८१९०३ जणांना विविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. मागील नऊ महिन्यात दररोजचे सरासरी २१५५ प्रमाणपत्रांचे जिल्ह्यातून वितरण होत आहे. यात सर्वाधिक २९५५७८ उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे. त्याखालोखाल सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र १८९६२९, वय- राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ५४४८१, नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र ३८६४९, रहिवास दाखला २००८, ऐपत प्रमाणपत्र ७०६, शेतकरी दाखला ६७३, अल्पभूधारक दाखला ९१, भूमिहीन प्रमाणपत्र ३६, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३६, तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र १४, डोंगरी प्रमाणपत्र २ जणांना वाटप करण्यात आले. पाच वर्षांत ४ लाख ८३ हजार १३ जात प्रमाणपत्रांचे वाटप जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०८४१३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

सन २०२२-२३ या‌ वर्षातील १२ महिन्यात ९५४३३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दररोज सरासरी २६१ जात प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते. यावर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या ७ महिन्यांच्या कालावधीतच ८२८९६ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत दररोजचे सरासरी ३९४ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ‘महसूल प्रशासनाने जलदपणे काम करत नागरिकांना वेळेत घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडत नाही. एका क्लिकवर त्यांना कागदपत्र उपलब्ध झाली आहेत. या कागदपत्रांचा नागरिकांना पुढील शैक्षणिक, नोकरी व वैयक्तिक कामांना फायदा होणार असल्याची प्रति‍क्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in