मंगेशकर रुग्णालय, डॉ. घैसास यांना दिलासा

ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.
मंगेशकर रुग्णालय, डॉ. घैसास यांना दिलासा
Published on

पुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. हा ६ पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला आहे.

या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी या अहवालातील चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा अभिप्राय मागवला आहे.

या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर उपचार प्रक्रियेतील त्रुटी व संपूर्ण घटनाक्रम मांडला होता.

logo
marathi.freepressjournal.in