
मुंबई : राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात लवकरच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जबाबदारी वाघमारे यांच्यावर असणार आहे. राज्य सरकारने सोमवारी वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील.