"तुम्ही स्त्रियांना..." दीपाली सय्यदने केली अजित पवारांच्या त्या विधानावर टीका

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात एकही महिला मंत्री नसल्याची खंत व्यक्त केली होती, तसेच त्याआधी मंत्री नारायण राणेंवर टीका करताना एक विधान केले होते
"तुम्ही स्त्रियांना..." दीपाली सय्यदने केली अजित पवारांच्या त्या विधानावर टीका

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका करताना, 'नारायण राणे हरले, एका बाईसमोर हरले' असे विधान केले होते. यावरून आता शिंदे गटाच्या समर्थक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आक्षेप घेत अजित पवारांवर टीका केली. अजित पवारच स्त्रियांना मानसन्मान देत नसल्याचा आरोप केला. नागपूरमध्ये झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.

दीपाली सय्यद म्हणाल्या की, "अजित पवारांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना 'बाईसमोर' हा शब्द वापरला. हे कितपत चांगले वाटते? तुम्ही स्त्रियांना मानसन्मानच देत नाही. तुम्ही काय अपेक्षा ठेवता? आज हे म्हणतात मंत्रिमंडळात स्त्री नाही, मग स्त्री का दिसत नाही? हे त्यांनी तपासले पाहिजे. ३ वर्षांपूर्वी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा करू शकले नाहीत. कारण पुरुषप्रधान संस्कृतीसाठी, पुरुषांना मोठे करण्यासाठी महिलांना त्यांनी स्थान दिले नाही. असे असेल तर हे पुढे काय काम करणार आहात? या मोठ्या दिग्गज नेत्यांनी महिलांची ही स्थिती समजून घ्यावी.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in