'या' भाजपा खासदाराची संभाजी भिडेंविरोधात थेट भूमिका ; म्हणाले, "व्हिडिओ पाहून कारवाई करु"

संभाजी भिडेंची सगळी वक्तव्य निषेधार्थ आहेत. महात्मा गांधी यांचं देशात नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचा गौवर करण्यात आल्याचं हे खासदार म्हणाले.
'या' भाजपा खासदाराची संभाजी भिडेंविरोधात थेट भूमिका ; म्हणाले, "व्हिडिओ पाहून कारवाई करु"

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरु त्यांच्यावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. संभाजी भिडे हे यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. आता त्यांनी गांधीजींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यभरातील काँग्रेस तसंच पुरोगामी संघटना आग्रमक झाल्या आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून भिडेंवर कारवाई करत अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील आक्रमक भूमिका घेत भिडेंच्या अटकेची मागणी केली. यानंतर त्यांच्यावर आमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

संभाजी भिडेंविरोधात राज्यभरातील काँग्रेस आक्रमक झाली असताना आता भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी देखील भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "संभाजी भिडेंची सगळी वक्तव्य निषेधार्थ आहेत. महात्मा गांधी यांचं देशात नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचा गौवर करण्यात आला. अशी वक्तव्य करुन सामाजिक आरोग्य बिघणार नाही. याची काळजी घ्यायला हवी, अशी टीका संजय काका पाटील यांनी केली आहे." यावेळी बोलताना त्यांनी शिवप्रष्ठाणचे धारकरी काही चुकीचं वक्तव्य करत असतील तर व्हिडिओ पाहुन त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा देखील दिला.

सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय काका पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं. दरम्यान, काल सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यावेळी त्यांनी भिडे गुरुजींना आडवं येणाऱ्यांना आडवं करु, असा इशारा दिला होता. त्यावर अशी वक्तव्य करणाऱ्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील संजयकाका पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन वरुन तसंच ई-मेल द्वारे ही धमकी देण्यात आली होती. तर काँग्रेस नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना देखील तुमची देखील "दाभोळकर यांच्यासारखी गत करु", अशी धमकी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in