बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधातील याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश; सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम करण्यासाठी राज्य सरकारने २७ सप्टेंबर २०१६ रोजी एका आदेशाद्वारे बोर्ड स्थापन केले होते. त्याआधी ४ डिसेंबर २०१४ रोजी स्मारक उभारण्याबाबत उच्चस्तरीय समिती बनविण्यात आली.
बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधातील याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश; सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांचा बंगल्यातील स्मारकाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला याचिकेत दुरूस्ती करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी जूनपर्यंत तहकूब ठेवली.

शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम करण्यासाठी राज्य सरकारने २७ सप्टेंबर २०१६ रोजी एका आदेशाद्वारे बोर्ड स्थापन केले होते. त्याआधी ४ डिसेंबर २०१४ रोजी स्मारक उभारण्याबाबत उच्चस्तरीय समिती बनविण्यात आली. या समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या. या समितीने स्मारक उभारण्यासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय घेतला होता. नगरविकास खात्याने २६ जानेवारी २०१६ रोजी मुंबई महापालिका आयुक्तांना आदेश देऊन महापौर बंगल्याची जागा हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. त्या विरोधात मानव जोशी आणि जनहित मंचचे अध्यक्ष भागवानजी रयानी यांनी सात वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकार, महापालिका आणि पुरातन वास्तू संवर्धन समितीने स्मारकात रूपांतर करताना आवश्यक आणि नियमानुसार सर्व परवानग्या घेऊन सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयात केला आहे. त्यावर याचिकाकर्त्यांला याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा न्यायालयाने दोन वर्षापूर्वी दिली होती. दरम्यान, याचिकाकर्त्यांने याचिकेत दुरूस्ती करून नव्याने याचिका दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in