विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांना‘नवदुर्गा सन्मान'

वैद्यकीय सेवेत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना तात्काळ सेवा व चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेल
विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांना‘नवदुर्गा सन्मान'

पुणे: वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल लोणी-काळभोर येथील माईर्स विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांना ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

जगदीश मुळीक फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रातील बहुआयामी कर्तबगार महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा पी.ई.एस सभागृह, मॉडर्न कॉलेज कॅम्पस, शिवाजीनगर, पुणे येथे नुकताच पार पडला.

या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, जगदीश मुळीक फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते.

डॉ अदिती कराड या नेहमीच ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर भर देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी उच्च दर्जाची सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. कोविड काळातील रूग्णांना विशेष सेवा देण्यासाठी कराड यांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. अदिती कराड म्हणाल्या, मला आज जो पुरस्कार मिळाला त्यामुळे माझ्यावर काम करण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे. वैद्यकीय सेवेत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना तात्काळ सेवा व चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in