मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, शिंदे समिती बरखास्त करा; छगन भुजबळ यांनी मागणी

सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, मराठा समाज ओबीसीमध्ये बसत नाही - भुजबळ
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, शिंदे समिती बरखास्त करा; छगन भुजबळ यांनी मागणी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्ही मान्य करणार नाहीत. राज्यभरात नोंदणी तपासण्याची संमती नव्हती. शिंदे समिती बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, मराठा समाज ओबीसीमध्ये बसत नाही, अशी मागणी राज्यातील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरु केल्यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट विरोध केला आहे.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्याला आरोपआप ओबीसी आरक्षण मिळते. कुणबी नोदं असल्यास प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. पण सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचं भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या समितीला हरकत नाही. शिंदे समितीला राज्यभरात पुरावे पडताळण्याची संमती नव्हती. सर्वच प्रमाणपत्रावर कुणबी लिहिलं जात आहे. आपला मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध असल्याचं ते म्हणाले.

भुजबळांनी एक दगड मारला का? एका टायर जाळला? हे म्हणतात आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करु नका, बीड कुणी जाळलं हे बघा ना. मी जबाबदारीने वक्तव्य केली आहेत. इतरांना समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे तेवढाच भुजबळला सुद्दा अधिकार आहे, असं देखील ते म्हणाले.

मराठवाड्यात कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाहीत. हा मुळ मुद्दा होता. याचा तपास व्हावा यासाठी न्यामूर्ती शिंदे समिती स्थापन केली. संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्यात जाऊ पडताळणी करण्याचं सांगितलं नव्हतं. सरसकट मराठा आरक्षण द्या, ही मागणी आम्ही मान्य करुन शकत नाही. मराठवाड्यातील वंशावळ चेक करुन कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीमध्ये येतात, असंही ते म्हणाले.

मी ओबीसींची बाजू मांडतो

या सभेत बोलताना भुजबळ यांनी आपण कोणत्याही समाजाचा प्रचार करत नसल्याचं सांगितलं. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मी ओबीसींची बाजू मांडतो. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या पाहुण्यांनी बीड जाळलं. मराठा समाजाला विरोध नाही, आरक्षण द्यायला विरोध नाही. पोलीस महिला हॉस्पिटलमध्ये आहेत. पोलिसांना पाठिंबा देण्याची गरज आहे. बीडमध्ये नेमकं काय घडलं याबाबत गृहमंत्र्यांनी माहिती घ्यावी, असं देखील भुजबळ यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in