‘टीईटी’ गैरव्यवहारप्रकरणी उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

२०१९-२० साली घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याने पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली
‘टीईटी’ गैरव्यवहारप्रकरणी उमेदवारांवर  अपात्रतेची कारवाई

राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’ गैरव्यवहारप्रकरणी तब्बल ७ हजार ८८० उमेदवारांवर कारवाई केली आहे. या सर्वांना यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही. तसेच सेवेत असणाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.

२०१९-२० साली घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याने पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्यात शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम सुपेसह मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सायबर पोलिसांच्या हाती अनेक कोटींची संपत्ती लागली होती. या सगळ्या उमेदवारांवर दोषारोपपत्र पुणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई प्रशासन करणार होते, ती कारवाई बुधवारी करण्यात आली ज्या ७ हजार ८८० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी जे उमेदवार सेवेत असतील त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.

‘टीईटी’मध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७,८८० परीक्षार्थीना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले होते. या ७,८८० उमेदवारांमधील २९३ उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे तयार केली होती आणि ते आज सेवेत आहेत, अशा उमेदवारांना देखील बडतर्फ करण्यात येणार आहे.

बुधवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानी पत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in