
नाशिक : नॅशनल केटरिंग डे निमित्त नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान टीबी मुक्त कार्यक्रमांतर्गत ११ क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहाराचे वाटप केले. पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान प्रथम वर्धापनदिन व पंधरवाडा निमित्त 'निक्षय मित्र’ नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशनने नाशिक शहर क्षयमुक्त करण्यासाठी मनपा क्षयरोग पथक नाशिक (टीयु) अंतर्गत मायको दवाखाना, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या ११ क्षयरुग्णांना सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोग मुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने पोषण आहार देण्यास संमती दर्शविली आहे.
डॉ. अशोक करंजकर, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष, राजु व्यास, उपाध्यक्ष, अनिल जोशी, सचिव, भास्कर दिंडे, सदस्य, श्रीकांत निरगुडकर यांचे हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आले. या उपक्रमास संदिप सोनार, मंदार तगारे, दिनेश आमनकर, वैशाली सोनार, जलसा आमनकर, अविनाश जोशी, मोनिका व्यास या सदस्यांनी हातभार लावला आहे.
अध्यक्ष राजू व्यास यांनी क्षयरुग्णांनी सकस आहार, औषधी नियमित व वेळेवर घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी मायको दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहू देशमुख, क्षयरोग पथक नाशिक टियु पर्यवेक्षक तुषार जावळे, विवेक जोपळे, तसेच मायको दवाखाना कर्मचारी उपस्थित होते, तुषार जावळे यांनी नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिक यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार मानले. यापुढे देखील अधिकाधिक क्षयरुग्णांना पोषण आहार मिळवुन देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.