औरंगाबाद येथे दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साहित्याचं वाटप

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुर्वसन केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णाल चिखलठाणा(औरंगाबाद) यांच्या सुंयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला
औरंगाबाद येथे दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साहित्याचं वाटप

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुर्वसन केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णाल चिखलठाणा(औरंगाबाद) यांच्या सुंयुक्त विद्यमाने दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचं मोफत वाटप करण्यात आलं. ३१ ऑगस्ट (गुरुवार) रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मा. तुपे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा उप. मुख्यकार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसंच जिल्हा शल्यचिकित्सक दयानंद मोतीपोवळे, अति. जिल्हा शल्यचिकीत्सक पद्मजा सराफ यांच्यासह विविध मान्यवरांनी देखील या कार्यक्रमला आपली उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात पुर्वसन केंद्राचे समन्वयक सागर कान्हेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत दिव्यांगांच्या अडचणी आमि त्यासाठी केंद्रामार्फक गेल्या १४ वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती दिली. यानंतर मोटार ट्रायसायकल, ट्रायसायकल, व्हील चेअर, सीपी चेअर, एलबो क्रचस , एॅक्सिलरी वॉकिंग स्टिक, ब्रेल क्रेन, गुगम्या केन, स्मार्ट पोन, बीटीई डिजिटल श्रवण यंत्र, रोलेटर चाईल्ड, रोलेटर प्रौढ या कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचं ६८५ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आलं.

या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोतीपिवळे यांनी मानसिक दृष्ट्या सदृढ होऊन समस्यांवर मात करण्याचं आवाहन केलं. तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकार्यक्रमाचं समारोपीय भाषण करताना पुनर्वसन केंद्राच्या कार्याची दखल घेतली, दिव्यांगांनी साहाय्यभूत साधनांच्या आधारे स्वावलंबनाकडे वळावं आणि मुख्य प्रवाहात यावं, असं सांगितलं. तसंच दृश्य अदृश्य दिव्यांगत्वाविषयी सर्वांनी जागरुक राहण्याचं मत व्यक्त केलं. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुर्नसन केंद्राचे सागर कान्हेकर ऋषिकेश सरगर सह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं.

logo
marathi.freepressjournal.in