राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ४५ कोटींची दिवाळी भेट

एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ४५ कोटींची दिवाळी भेट
Published on

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर एसटी महामंडळावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तसेच एसटीला उभारी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वेळेत वेतन, बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवत पुन्हा कामावर रुजू करून घेणे यानंतर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन २१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी जारी केले. याचवेळी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचे देखील वेतन दिवाळीपूर्व करावे अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली. याबाबत विचार करत राज्य सरकारने एसटी महामंडळातील ९० हजार कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी रुपयांची घोषणा करत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. या निधीतून एसटी अधिकाऱ्यांना ५ हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी रक्कम मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in