राजकीय नेत्यांच्या सभेला जाऊ नका; जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन

राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा समाजाला शुक्रवारी केले.
संग्रहित छायााचित्र
संग्रहित छायााचित्र
Published on

बीड : राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा समाजाला शुक्रवारी केले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी हे आवाहन केल्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी जमवताना नाकीनऊ येण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे - पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सक्रीय झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. बीड जिल्ह्यातील बेलगाव येथे मराठा बांधवांशी शुक्रवारी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला राजकीय नेत्यांच्या सभांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

जरांगे म्हणाले, सध्या महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. पण तुम्ही शांत व सावध राहा. त्रास देणाऱ्याला आपल्याला पाडायचे आहे. मी एकेका काठीचा (आंतरवाली सराटीतील लाठीचार्ज) हिशेब घेईल. आता कितीही त्रास झाला तरी मागे हटायचे नाही. आपण आपली, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाने राजकीय सभांपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना आपल्या बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी जमवणे कठीण होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in