कोविड रुग्णाला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा

२०२१ च्या कोरोना महासाथीच्या काळात कोविड रुग्णाला ठार कर, असे आदेश देणाऱ्या वरिष्ठ सरकारी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची ध्वनिफित सोशल मीडियावर व्हायरल झाली.
कोविड रुग्णाला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

लातूर : २०२१ च्या कोरोना महासाथीच्या काळात कोविड रुग्णाला ठार कर, असे आदेश देणाऱ्या वरिष्ठ सरकारी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची ध्वनिफित सोशल मीडियावर व्हायरल झाली.

कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. शशिकांत डांगे हे कार्यरत होते. तेव्हा त्यांचे वरिष्ठ डॉ. शशिकांत देशपांडे यांनी डांगे यांना सांगितले की, रुग्ण, कौसर फातिमा, दयामी अजीमोद्दीन गौसोद्दीन (५३) यांच्या पत्नी, नंतर आजारातून बरे झाल्या होत्या.

या ध्वनीफितीतील संभाषणात, डॉ. देशपांडे असे म्हणतात की, "कोणालाही आत जाऊ देऊ नका, फक्त त्या दयामी या महिलेला मारून टाका." यावर, डॉ. डांगे सावधपणे उत्तर देतात, ते म्हणतात की, ऑक्सिजन आधीच कमी केला आहे.

गौसोद्दीन यांनी डॉ. देशपांडे यांच्याविरोधात उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी देशपांडे यांचा फोन जप्त केला असून त्यांना नोटीस बजावली. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी सांगितले.

ते या ध्वनिफितीची सत्यता तपासून पाहत आहेत. पोलिसांनी डॉ. डांगे यांनाही नोटीस बजावली आहे. ते सध्या बाहेरगावी गेले असून शनिवारी परतणार आहेत. आम्ही त्यांचाही मोबाइल फोन ताब्यात घेणार असून चौकशी केली जाईल, असे पोलीस म्हणाले.

२०२१ मध्ये माझी पत्नी कौसर फातिमा या कोविड पॉझिटिव्ह झाल्या. त्यांना उदगीरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. डांगे हे उपचार करत होते. त्याचवेळी डॉ. देशपांडे यांचा फोन डांगे यांना आला होता. त्यावेळी डॉ. देशपांडे यांनी डॉ. डांगे यांना दयामी या रुग्णाला ठार करण्याचे आदेश दिले, असा दावा तक्रारदाराने केला.

logo
marathi.freepressjournal.in