पाचगणीजवळ डॉक्टरांची रेव्ह पार्टी ;चार नर्तिकांसह नऊ जणांना अटक

पोलिसांनी कारवाई करत चार महिलांसह सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्ट चालक असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.
पाचगणीजवळ डॉक्टरांची रेव्ह पार्टी ;चार नर्तिकांसह नऊ जणांना अटक
PM

कराड : महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका रिसोर्टवर पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली. पोलिसांनी चार नर्तिकांसह नऊ जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रिसार्ट मालक विशाल सुरेश शिर्के (३६) याच्यासह सातारा, सांगली जिल्ह्यातील आठ डॉक्टर तसेच चार नर्तिकांचा समावेश आहे. पाचगणी जवळच असणाऱ्या कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर युवतींची तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करत पार्टी चालू असल्याची माहिती साताऱ्याच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून त्यांनी साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करत कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले.

मंगळवारी रात्री पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचताच स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले. पोलिसांनी कारवाई करत चार महिलांसह सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्ट चालक असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in