Pune : दौंडमधील म्हसोबाच्या यात्रेत पिसाळलेला कुत्रा घुसला आणि....

पुण्यातील (Pune) दौंडमध्ये एक पिसाळला कुत्रा एसआरपी कॅम्पमध्ये सुरु असलेल्या म्हसोबाच्या यात्रेत घुसला आणि एकच गोंधळ उडाला.
Pune : दौंडमधील म्हसोबाच्या यात्रेत पिसाळलेला कुत्रा घुसला आणि....
Published on

पुण्यातील (Pune) दौंडमधील एसआरपी कॅम्प परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल २०-२२ जणांचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा दौंड परिसरात फिरत होता. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

१५ नोव्हेंबरला एसआरपी कॅम्पमध्ये म्हसोबाची यात्रा होती. या यात्रेमध्ये एक पिसाळलेला कुत्रा घुसला आणि तिथे असणाऱ्या नागरिकांचा चावा घेत सुटला. यामध्ये २०-२२ जण जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालय आणि ससून रुग्णालयात उपचार घेण्यास पाठवले. जखमींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. तसेच, दौंड नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in