‘इंडिया’ला घाबरू नका, ‘दक्ष’ राहा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपला सल्ला

बैठकीत ३० महिला प्रतिनिधींसह २६७ पदाधिकारी सहभागी झाले आहेत
‘इंडिया’ला घाबरू नका, ‘दक्ष’ राहा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपला सल्ला

पुणे : येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी बनवली आहे. त्यामुळे आपला संघर्ष अधिक व्यापक बनू शकतो. त्यांना घाबरण्याची गरज नाही. पण, निष्काळजीपणा चालणार नाही. भाजपने ‘दक्ष’ राहून काम करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीत दिल्याची चर्चा आहे.

पुण्यात रा. स्व. संघाच्या अ. भा. समन्वय समितीची बैठक सुरू आहे. शनिवारपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत संघाच्या ३६ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित आहेत.

या बैठकीत ३० महिला प्रतिनिधींसह २६७ पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या बैठकीत राष्ट्रीय, सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आदींबाबत चर्चा होणार आहे. पर्यावरण, सामाजिक समरसता, संघटना विस्तार याबाबत चर्चा होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in