माझ्या वाढदिवशी होर्डींग, जाहिरातींवर खर्च करु नका, तो पैसा इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांच्या मदतीसाठी उपयोगात आणा - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात बसून इर्ळालवाडी दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यचं सांनियंत्रण करत होते
माझ्या वाढदिवशी होर्डींग, जाहिरातींवर खर्च करु नका, तो पैसा इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांच्या मदतीसाठी उपयोगात आणा - अजित पवार

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी या २०० ते२५० जणांच्या वस्तीवर दरड कोसळली. यात सर्व गाव दबलं गेलं. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांचा बचाव पथकाने ढिकाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रणावर जीवित तसंच वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ जुलै हा अजित पवार यांचा वाढदिवस असून त्याचे चाहते, समर्थक, हितचिंकत, कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाढदिवस साजरा करता. इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही माझा वाढदिवस साजरा करु नये. होर्डीग, पुष्पगुच्छ, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावच्या उभारणीसाठी आणि गावकऱ्यांच्या मदतीसाठी उपयोगात आणता येईल, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात बसून तिथून राजगडमधील इर्ळालवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यचं सांनियंत्रण करत होते. लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी अजित पवार यांनी आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी बातचित केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in