डॉ. भोळे यांच्यासह ६ जणांना अटक, रामायणावरील वादग्रस्त नाटकप्रकरणी कारवाई

रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या वादग्रस्त नाटकप्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.
डॉ. भोळे यांच्यासह ६ जणांना अटक, रामायणावरील वादग्रस्त नाटकप्रकरणी कारवाई

पुणे : रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या वादग्रस्त नाटकप्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्षेप नोंदवत तक्रार दाखल केली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र आणि सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणावर आधारित 'रामलीला' नाटक सादर केले. त्यात सीतेची भूमिका पुरुषाने सादर केली होती आणि तो कलाकार नाटकात कथितरीत्या धूम्रपान करताना दाखवला होता. तसेच कलाकारांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते. त्यावर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत कार्यक्रम बंद पाडला. त्यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रतिकार करत धक्काबुक्की केली. अभाविपचे कार्यकर्ते हर्षवर्धन हरपुडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ललित कला केंद्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि पाच विद्यार्थ्यांना अटक केली. भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले अशी अटक झालेल्या विद्य्रार्थ्यांची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in