एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गेल्या २७ ऑगस्टला सायन येथे आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मुंबईमध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेले डॉ. रुपनवर यांचे गावकरी व फलटण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालया बाहेर जन आक्रोश आंदोलन केले.

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा
एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा
Published on

कराड : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गेल्या २७ ऑगस्टला सायन येथे आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मुंबईमध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेले डॉ. रुपनवर यांचे गावकरी व फलटण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालया बाहेर जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ लीना मदने, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीए प्रसाद कोंडे-देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचा कथित पीए दत्तात्रय मोहिते, कुमार परदेशी यांच्यावर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा, अशी संतप्त मागणी डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक व गावकरी यांनी केली.

नातेपुते माळशिरस सदाशिवनगर परिसरातील हजारो नागरिक भर उन्हात फलटण येथील बारामती चौकतील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे रस्त्यावर ठिय्या मांडून होते. यावेळी जमलेल्या गावकऱ्यांनी डॉ रुपनवर यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, तसेच वरील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते. उपजिल्हा रुग्णालयाला रात्रीपासूनच पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पीएना आरोपी करा?

जन आक्रोश मोर्च्यातील डॉ रुपनवर यांच्या नातेवाईकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय मोहिते हे धमकी व धक्का बुक्की घटने वेळी हजर होते. त्यामुळे त्यांनाही आरोपी करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे यामुळे फलटणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

उपजिल्हा रुग्णालयच केले बंद

आंदोलनामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय बंद केले होते. मात्र, अतिदक्षता विभाग सुरूच होता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात डॉ. रुपनवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा फलक लावला होता. यामुळे येथील कर्मचारी भावनाविवश व हताश झाल्याचे पाहायला मिळाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in