डीआरआय उपसंचालकांना दाऊद टोळीच्या नावे धमकी

महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पुणे विभागीय कार्यालयातील उपसंचालकांना दाऊद इब्राहिम टोळीच्या नावे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुबईहून मुंबई विमानतळावर आणलेले लॅपटॉप आणि मोबाईल संच सीमाशुल्क विभागाने जप्त केल्यानंतर, ते सोडवून देण्यासाठी आरोपीने उपसंचालकांवर दबाव आणला होता.
डीआरआय उपसंचालकांना दाऊद टोळीच्या नावे धमकी
डीआरआय उपसंचालकांना दाऊद टोळीच्या नावे धमकीसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पुणे विभागीय कार्यालयातील उपसंचालकांना दाऊद इब्राहिम टोळीच्या नावे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुबईहून मुंबई विमानतळावर आणलेले लॅपटॉप आणि मोबाईल संच सीमाशुल्क विभागाने जप्त केल्यानंतर, ते सोडवून देण्यासाठी आरोपीने उपसंचालकांवर दबाव आणला होता. हे साहित्य न सोडवल्याने आरोपीने अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबाला पुण्यातून बाहेर पडू न देण्याची धमकी दिली.

या प्रकरणी मुश्ताक शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सुरुवातीला खबऱ्या म्हणून काम करायचे असल्याचे सांगून उपसंचालकांच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना सांगून जप्त वस्तू सोडवण्याची मागणी केली. उपसंचालकांनी नकार दिल्यानंतर आरोपीने ६ जून रोजी पहाटे समाज माध्यमावर ऑडिओ संदेश पाठवून, आपण गेल्या ३० वर्षांपासून तस्कर असून दाऊद टोळीसाठी काम करत असल्याची धमकी दिली.

logo
marathi.freepressjournal.in