मुंबई : राज्यातील ४० तालुक्यांत याआधीच दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त ज्या इतर तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती होती अशा तालुक्यांमधील १०२१ महसुली मंडळातही दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली होती. आता या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुली मंडळांत तसेच लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावातील २२४ नवीन महसुली मंडळात देखील दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने याबाबतचा शासननिर्णय जारी केला आहे.
राज्य सरकारने ४० तालुक्यांत आधीच दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील ज्या महसुली मंडळांत जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा १०२१ महसुली मंडळांतही दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली होती. आता या १०२१ महसुली मंडळांचे विभाजन होऊन जी नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यात आली आहेत, तसेच ज्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावातील २२४ महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे.